सर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा
येथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा
हे धुके, अशी हवा, ही उदासता भरे
सूर सूर मिटुनिया लोपलीत पाखरे
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा
रात्र रात्र जागुनी वाट पाहिली कुणी
मंद होऊनी विरे अन् पहाटचांदणी,
स्वप्न संपुनी असे ये कठोर वंचना
काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी ?
भान राधिके नुरे ऐकताच बासरी
बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा
हाक धुंद ही तुझी अंग अंग वेढिते
होऊनी प्रवाह या बंधनात ओढिते
मी मला अजाणता गुंतले अशी पुन्हा
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा
धुंद धुंद गंध ये दाटुनी फुलाविना
येथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा
हे धुके, अशी हवा, ही उदासता भरे
सूर सूर मिटुनिया लोपलीत पाखरे
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा
रात्र रात्र जागुनी वाट पाहिली कुणी
मंद होऊनी विरे अन् पहाटचांदणी,
स्वप्न संपुनी असे ये कठोर वंचना
काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी ?
भान राधिके नुरे ऐकताच बासरी
बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा
हाक धुंद ही तुझी अंग अंग वेढिते
होऊनी प्रवाह या बंधनात ओढिते
मी मला अजाणता गुंतले अशी पुन्हा
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा
धुंद धुंद गंध ये दाटुनी फुलाविना
धुंद धुंद गंध ये दाटुनी फुलाविना
ReplyDelete"बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा" ...मस्त!
ReplyDeleteमस्त!!
ReplyDeleteसर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा
ReplyDeleteवा!
बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा..खूप खास.
ReplyDelete