स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा
शोक हवा परि वाल्मिकिच्या परि सद्रव अन सश्लोक हवा
हर्ष हवा परि स्पर्शमण्यापरि त्यांत नवा आलोक हवा
शंतनुचा मज मोह हवा अन ययातिचा मज देह हवा
पार्थाचा परि स्नेहविकंपित स्वार्थ सदा संदेह हवा
इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा हृद्रोग हवा
योग असो रतिभोग असो अतिजागृत त्यात प्रयोग हवा
आयु हवे आरोग्य हवे यशभाग्य तसा प्रासाद हवा
श्लाघ्य हवे वैराग्य तयास्तव त्यांत विरोध विषाद हवा
तापासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा
शिळांत पिचतां जळांतुनी मज निळा निळा उःशाप हवा
मार्क्साचा मज अर्थ हवा अन फ्रॉइडचा मज काम हवा
या असुरां परि राबविण्या घरिं गांधींचा मज राम हवा
लोभ हवा मज गाधिजमुनिचा अखंड आंतर क्षोभ हवा
पराभवांतहि अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षॊभ हवा
पार्थिव्यांतच वास हवा परि दिव्याचा हव्यास हवा
शास्त्रांचा अभ्यास हवा परि मानव्याचा ध्यास हवा
विश्व हवे सर्वस्व हवे अन मृत्यू समोर सयंत्र हवा
शरांत परि ही विव्हळतां तनु उरांत अमृतमंत्र हवा
हविभुक सुरमुख मी वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा
हे सुख दुर्लभ वाढविण्या मज चौर्यांशीत प्रवास हवा
चाह गयी, चिंता मिटी मनवा बेपरवाह
ReplyDeleteजिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह
-कबीर
कबीरांचा वरील दोहा मला खूप आवडतो :)
दोहा छान आहे, पण यात विरक्तीतला आनंद आहे.
ReplyDeleteएका कवितावाचनाच्या कार्यक्रमात या कवितेच्या प्रस्तावनेत पुलंनी म्हटलं आहे,
"The poet loved while he lived असं रवींद्रनाथांनी एका ठिकाणी म्हटलं आहे. बोरकरांचं सुद्धा या जीवनावर अतोनात प्रेम होतं यात शंकाच नाही. पण आपल्या जगण्याला सदैव एक उदात्ताचा स्पर्श असला पाहिजे अशी ओढ त्यांच्या मनामध्ये मोठी होती. 'रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा' (रसिकत्व कसं हवं? तर ज्याला पारलौकिकाचा, परतत्वाचा स्पर्श झाला आहे, जो शब्द आणि व्यक्त झालेल्यापलीकडे जाऊन जीवनाकडे पाहू शकतो, शब्देविणु संवादु करू शकतो, रसिकाची ती क्षमता सर्वात श्रेष्ठ.) तसं जीवनाबद्दल सुद्धा असावं असं त्यांना वाटत होतं."
❤️❤️
DeleteShare केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
ReplyDelete