Monday, June 25, 2012

अरुणा ढेरे : इतक्यातच झिमझिमून सर गेली

इतक्यातच झिमझिमून सर गेली
झुकून उन्हे, मिटून पुन्हा वर आली

रंग नवा स्वप्नांवर चढत पुन्हा
इतक्यात आस नवी मोहरली

फूल जसे, जीव तसा उमलत ये
इतक्यातच कळ दुखरी सरलेली

खटमधूर जीवनरस टपटपतो
इतक्यातच ओंजळ ही भरलेली

इतक्यातच गडद तुझी सय झाली
विस्कळल्या जगण्याला लय आली

http://www.youtube.com/watch?v=Pvdrr6xsBc0

7 comments:

  1. मस्तच! अरुणाबाईंच्या आवाजात ऐकायला खूपच छान वाटलं.

    ReplyDelete
  2. विस्कळल्या जगण्याला लय आली!
    छानच.

    ReplyDelete
  3. पुन:प्रत्ययाचा आनंद... ?
    ही कविता याआधीही पोस्ट झालेली होती.

    http://kavitanchagaon.blogspot.in/2010/09/blog-post_27.html

    ReplyDelete
    Replies
    1. हो, पण इथे कविता ‘ऐकायला’ मिळाली, प्रत्यक्ष कवयित्रींच्या आवाजात !!

      Delete
  4. माझा आवळत्या कवयित्री अरुणाताई ढेरे खूप सुंदर आवज आहे ताई तुमचा

    ReplyDelete