हवा पावसाळी जरा रात्र काळी
ढगाआडचा चंद्र थोडा फिका
दिवे दूर काही धुक्याच्या प्रवाही
जळी पूल कोणी लुळा मोडका
कुठे दाट खोपी उभे माड झोपी
पथी झावळांच्या खुळ्या सावळ्या
कुठे सर्द वारा जरा गर्द खारा
जीवा स्पर्शुनी त्याही भांबावल्या
कुणी बांग देतो कुणी वेध घेतो
अकस्मात तेजाळती काजवे
सुखाच्या तळाशी किती दु:खराशी
उरी कारणाविणही कालवे
नदी आज जागी उदासी अभागी
अजुनी न ये नीज या सागरा
हवा पावसाळी जरा रात्र काळी
हिची आगळी आज काही तर्हा
सुखाच्या तळाशी किती दु:खराशी
ReplyDeleteउरी कारणाविणही कालवे