कवितांचा गाव
Wednesday, November 3, 2010
आनंदलोक - कुसुमाग्रज
माझ्या आनंदलोकात
चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा
कधी वादळत नाही
माझ्या आनंदलोकात
केले वसंताने घर
आंब्या-आंब्याच्या फांदीला
फुटे कोकिळेचा स्वर
सात रंगांची मैफल
वाहे येथे हवेतून
येथे मरणही नाचे
मोरपिसारा लेवून.
2 comments:
अश्विनी
November 7, 2010 at 10:08 PM
वा !
Reply
Delete
Replies
Reply
nevendra
May 14, 2020 at 1:59 PM
निशब्द, आनंदलोकात वावरताना काही सुचेनास झाले।
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
वा !
ReplyDeleteनिशब्द, आनंदलोकात वावरताना काही सुचेनास झाले।
ReplyDelete