संधिप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी;
असावीस पास, जसा स्वप्नभास,
जीवी कासावीस झाल्यावीण;
तेंव्हा सखे आण तुळशीचे पान,
तुझ्या घरी वाण त्याची नाही;
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी,
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे;
रंभागर्भी वीज सुवर्णाची कांडी
तशी तुझी मांडी देई मज;
वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल:
भुलीतली भूल शेवटली;
जमल्या नेत्रांचे फिटू दे पारणे,
सर्व संतर्पणे त्यात आली.
संधिपकाशात अजून जो सोने
ReplyDeleteतो माझी लोचने मिटो यावी;