खुप खुप वर्षांपूर्वी
आकाशाशी
माझा करार झाला
आणि आकाशगंगेतील
ती छोटी तारका,
निळ्या पारव्या प्रकाशाचा,
पिसारा फुलवणारी,
माझ्या मालकीची झाली
तेव्हापासून
पृथ्वीवर जेव्हा
ज्वालामुखीच्या उद्रेकांनी
उसालेली उद्यानं
दग्ध होतात
किंवा कोकीळांची कूजनं
बाकीच्या प्रपातात,
गोठून पडतात,
तेव्हा
माझा निवास
त्या तारकेवर असतो,
व्यवहारापुरत
मी येथे
वावरत असलो तरी
कुसुमाग्रजांच्या नावची एक तारका खरोखरच आहे!
ReplyDelete