पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे
चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तिळ गालीचा
पूर्णविरामाच्या बिंदूतून
नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण
नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी: तू हट्टी पण...
पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते
-इंदिरा संत ('रंगबावरी')
मस्त!
ReplyDeleteकवितापण कवितेची निवडपण!
मी पोस्ट केल्यावर तू पोस्ट केलेली तिच कविता पाहिली. शेवटी काय मोठी लोक एक सारखाच विचार करतात. हे अस होत पोस्ट न मिळाल्यामूळे.
ReplyDeleteमी तरी पोस्ट करायच्या आधी, ब्लॉगवरील बाकीचे प्रकाशित लेख/कविता वाचते. त्यामुळे मला काही असे प्रोब्लेम येत नाही.
ReplyDeleteअसो, त्यामुळे मला साक्षात्कार झाला ना की माझे विचार पण ‘मोठया’ लोकांच्या विचारांशी जुळतात म्हणून (काही बाबतीत तरी)!
माझी कविता
ReplyDeleteब्लॉग लिही पण नको पाठवू
त्याची झेरॉक्स इनबॉक्सात
टीकाटिप्पणी सुरूच राहूदे
पूर्वीसारखी आवेशात.
पाठविसी ते सगळे सगळे
इनबॉक्सात त्वरितच मिळते
मूळ उतारा वाचण्यातली मग
गम्मत सारी निघूनच जाते.
चांगल्यान सांकली सोन्याची
ReplyDeleteही (anonymous) कॉमेंट कोनाची?