Saturday, July 10, 2010

कुसुमाग्रज : तो प्रवास सुंदर होता

आकाशतळी फुललेली
मातीतिल एक कहाणी
क्षण मावळतीचा येता
डोळ्यांत कशाला पाणी ?

तो प्रवास सुंदर होता
आधार गतीला धरती
तेजोमय नक्षत्रांचे
आश्वासन माथ्यावरती

सुख आम्रासम मोहरले
भवताल सुगंधित झाले
नि:शब्द वेदनांमधुनी
गीतांचे गेंद उदेले

पथ कुसुमित होते काही
रिमझिमत चांदणे होते
वणव्याच्या ओटीवरती
केधवा नांदणे होते

5 comments:

  1. नि:शब्द वेदनांमधुनी
    गीतांचे गेंद उदेले

    मस्त!

    ReplyDelete
  2. अश्याच आणखी कवितांचा आस्वाद घेण्यासाठी अवश्य भेट द्या ........

    http://gauravmarathicha.blogspot.in

    ReplyDelete
  3. परतीचा प्रवास देखील असाच सुन्दर व्हावा ....

    ReplyDelete
  4. त्या विराट शून्या मधली, ती एक वसाहत होती
    शून्यात प्रसवली शून्ये, शून्यांची रंगीत नाती

    त्या शून्यामधली यात्रा, वाऱ्यातील एक विराणी
    गगनात विसर्जित होता, डोळ्यात कशाला पाणी ?

    ReplyDelete
  5. केधवा चा अर्थ काय आहे ??

    ReplyDelete