Friday, July 9, 2010

पत्र लिही

पत्र लिही पण नको पाठवू
शाईअमधुनी काजळ गहिरे
लिपिरेषांच्या जाळी मधुनी
नको पाठवू हसू लाजरे;

चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटींतुन
नको पाठवू तिळ गालिचा
पुर्णविरामाच्या बिंदूतुन

नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन,
कागदातुन नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू विज सुवासिक
उलगडणारी घडी घडीतुन,
नको पाठवू असे कितीदां
सांगितले मी; तू हट्टी पण

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायचे राहुन जाते.

इंदिरा संत
नीरज स्मिता खास तुम्हा दोघांसाठी. काल पाठवू शकलो नाही.

3 comments:

  1. धन्यवाद! मस्त आहे. हीच कविता आशानेही टाकलीय.

    ReplyDelete
  2. कौस्तुभ,
    आशाने आम्हां बाकीच्यांसाठी पाठवली आहे.
    तीच कविता परत आली तर काय हरकत आहे?
    मोठे लोक काय एकसारखा विचार करतात, ते तरी आम्हांला कळेल.

    ReplyDelete
  3. खूपच छान कविता आहेत सर्व

    ReplyDelete