मन कशात लागत नाही,
अदमास कशाचा घ्यावा ।
अज्ञात झऱ्यावर रात्री,
मज ऐकू येतो पावा ॥
श्वासांचे घेउन बंधन,
जे हृदय फुलांचे होई ।
शिशिरात कसे झाडांचे,
मग वैभव निघुन जाई ॥
सळसळते पिंपळ-पान,
वाऱ्यात भुताची गाणी ।
भिंतीवर नक्षत्रांचे,
आभाळ खचवीले कोणी ॥
मन बहर-गुणांचे लोभी,
समईवर पदर कशाला ।
हे गीत तडकले जेथे,
तो एकच दगड उशाला ॥
चल जाऊ दूर कुठेही,
हातात जरा दे हात ।
भर रस्त्यामध्ये माझा,
होणार कधितरी घात ॥
मन कशात लागत नाही..।
मन कशात लागत नाही..॥
अदमास कशाचा घ्यावा ।
अज्ञात झऱ्यावर रात्री,
मज ऐकू येतो पावा ॥
श्वासांचे घेउन बंधन,
जे हृदय फुलांचे होई ।
शिशिरात कसे झाडांचे,
मग वैभव निघुन जाई ॥
सळसळते पिंपळ-पान,
वाऱ्यात भुताची गाणी ।
भिंतीवर नक्षत्रांचे,
आभाळ खचवीले कोणी ॥
मन बहर-गुणांचे लोभी,
समईवर पदर कशाला ।
हे गीत तडकले जेथे,
तो एकच दगड उशाला ॥
चल जाऊ दूर कुठेही,
हातात जरा दे हात ।
भर रस्त्यामध्ये माझा,
होणार कधितरी घात ॥
मन कशात लागत नाही..।
मन कशात लागत नाही..॥
मस्तच
ReplyDeleteसगळ्याच प्रतिमा आपल्याला कळतात असे म्हणणे शक्यच नाही पण जी काही अर्धवट, अस्फुट जाणीव होते तीही खूप छानच.
मस्त!
ReplyDeleteका कुणास ठाऊक आज दुपारपासून याच ओळी सोबतीला येऊन बसल्यात...
मन कशात लागत नाही,
अदमास कशाचा घ्यावा ।
अज्ञात झऱ्यावर रात्री,
मज ऐकू येतो पावा ॥