दिवसभराचे काम करुन थकल्यावरती
तुम्ही शिरू शकता तुमच्या नवर्याच्या कुशीत
त्याची इच्छा असेल तर,
त्याला झोप येऊन तो तुमच्याकडे पाठ करून झोपेपर्यंत.
पण त्याची इच्छा असेल
तर तुम्ही करू नका कंटाळा
कारण त्याची इच्छा असते तुम्हांला थोपटून तुमचा शीण घालवण्याची.
रात्री मध्येच तुमची छोटी उठल्यावरती
तुम्ही उठा तुमची स्वप्ने थांबवून
आणि कपडे चढवून, थोपटा तिला ती झोपेपर्यंत.
पण ती तशीच रडत राहिली
तर तिला बाहेर घेऊन जा खेळवायला;
नाहीतर तुमच्या नवर्याची झोपमोड होईल
कारण त्याला जायचे असते दुसर्या दिवशी कामावरती.
तुमच्या मोठ्याची आन्हिके, शाळा, अभ्यास
खाणेपिणे, भांडणे सोडविणे झाल्यावरती
वेळ काढून तयार करून द्या त्याला भाषण : ’माझी आई’
कारण त्याची इच्छा असते व्यासपीठावरून तुमचा गौरव करण्याची.
पाहुण्यांचे खाणे, फिरणे केल्यावरती
थोडावेळ आवर्जून बसा हसून खेळून त्यांच्याशी
कारण त्यांची इच्छा असते तुमच्याशी बोलण्याची,
तुमचे कौतुक करण्याची.
रेशन, बाजारहाट, बॅंक, सौजन्यभेटी
नवर्याच्या पॅंटचे तुटलेले बटण शिवणे,
त्याच्याबरोबर नटूनथटून अनोळखी पार्टीला जाणे
आणि हे सगळे करून तुम्ही मुद्दाम काढा वेळ
तुमची सतार, भरतकाम किंवा लिखाणासाठी
कारण तुमच्या नवर्याची इच्छा असते
तुमचे व्यक्तिमत्त्व विकसित करण्याची!