Sunday, April 10, 2011

बी. रघुनाथ - चंदनाच्या विठोबाची


चंदनाच्या विठोबाची
माय गावा गेली
पंढरी या ओसरीची
आज ओस झाली

कोनाड्यात उमडून
पडे घरकूल
आज सत्य कळो येई
दाटीमुटीतील

कांही दिसे भरलेले
रित्या बोळक्यात
गवसले आजवर
जे न रांजणात

6 comments:

  1. ही कविता बहुदा कांतांची आहे,
    शब्दही आठवणीत आहेत तसे लिहिले आहेत.
    काही बदल असतील तर कळवा.

    ReplyDelete
  2. धन्यवाद, मिलिन्द!
    कविता रघुनाथांची आहे, हे कळवलंस.
    दोघेही परभणीचे म्हणून माझा घोळ झाला का? कोण जाणे.
    कधीची ही कविता मनात घोळते आहे पण कातांची आहे याची
    खात्री वाटत नव्हती म्हणून टाकली नव्हती.

    शब्द बरोबर असावेत.
    बदल असेल तर कळवा.

    ReplyDelete
  3. वाह, काय सुंदर आहे ही कविता☺️

    ReplyDelete
  4. वाह, काय सुंदर आहे ही कविता☺️

    ReplyDelete
  5. अगदी थोड्या शब्दात मोठा भावार्थ सांगणारी कविता खूप भावली.

    ReplyDelete
  6. कविता खूपच आहे सुंदर , पण जर या कवितेचा उत्तूंग असलेला भावार्थ कळला तर यातला गोडावा आणखीणच वाढेल

    ReplyDelete