Monday, May 13, 2013

विंदा करंदीकर -- प्रेम करावे असे, परंतू….


हिरवे हिरवे माळ मोकळे;
ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई;
प्रेम करावे अशा ठिकाणी
विसरुनि भीती विसरुनि घाई.
प्रेम करावे, रक्तामधले;
प्रेम करावे शुद्ध, पशूसम;
शतजन्मांच्या अवसानाने
रक्तामधली गाठावी सम.
प्रेम करावे मुके अनामिक;
प्रेम करावे होउनिया तृण;
प्रेम करावे असे, परंतू….
प्रेम करावे हे कळल्याविण.

2 comments:

  1. ...................
    प्रेम करावे असे, परंतू…
    प्रेम करावे हे कळल्याविण.

    ReplyDelete
    Replies
    1. जाणोनि नेणते करी माझे मन I
      तुझी प्रेमखूण देऊनिया II
      :)

      Delete