मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले ।
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले ॥पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी |
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी||
घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा |
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा ||
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे ।
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे ॥
रानात एककल्ली सुनसान सांजवेळी ।
डोळ्यात गल्बताच्या मनमोर रम्य गावी ॥
केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना |
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे||
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे||
मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले ।
त्या राजबन्सी कोण्या डोळ्यात गुंतलेले ॥
No comments:
Post a Comment