Sunday, July 10, 2011

बा. भ. बोरकर: खूप या वाड्यास दारे

खूप या वाड्यास दारे, एक याया कैक जाया
दो घडी येतात तेही लावुनी जातात माया

पाखरांची मुक्त मांदी गात ये आल्हाद नांदी
अंगणी तालात डोले एक न्हाती शुभ्र फांदी

गोठणीसाठी गुरांची सावलीशी गर्द दाटी
कोण मायेने कुणाशी पाठ घाशी, अंग चाटी

पंढरीचा पांथ दारी गोड छेडी एकतारी
साधते त्याच्या अभंगे बैसल्या जागीच वारी

कावळा सांगून जातो पाहुणा येणार आहे
त्यामुळे घासात माझ्या अमृताची धार वाहे

आणखी रात्री, पहाटे चांदणे शेजेस येते
अन् फुली वेढून मातें स्वप्निच्या राज्यात नेते

आप्त सारे भेट घेती जे तिथे वस्तीस गेले
सांगतो मी त्यास किस्से पाहिलेले ऐकिलेले

मी खरा तेथील वासी हा न वाडा ही सराई
पाहुणा येथे जरी मी जायची मातें न घाई

10 comments:

  1. अंगणी तालात डोले एक न्हाती शुभ्र फांदी

    ReplyDelete
  2. एक याया 'कैक' जाया

    ReplyDelete
  3. धन्यवाद!
    दुरुस्ती केली आहे.

    ReplyDelete
  4. धन्यवाद!

    ReplyDelete
  5. "खूप या वाड्यास दारे ,
    एक याया कैक जाया,
    दो घडी येतात तेही ,
    लावूनी जातात माया ,
    पाखरांची मुक्त मांदी,
    गात ये आल्हाद नांदी ,
    अंगणी तालात डोले,
    एक न्हाती शुभ्र फांदी ,
    आणखी रात्री पहाटे,
    चांदणे शेजेस येती ,
    आणि फुले वेढून माती,
    स्वप्नीच्या राज्यात नेती,
    मी खरा तेथील वासी ,
    हा न वाडा हि न सराई,
    पाहुणा जरी मी ,
    जायची माते न घाई.

    हि कविता अशी आहे का originally

    ReplyDelete
  6. Hi kavita gandha ya Marathi picture madhe Nina kulkarni yanchya patrane mhantli . Khup divsanpasun shodhat hoto. Aj sapadli. Khup ananda zala. Tumche khup khup dhanyawaad!!

    ReplyDelete
  7. Mi hi Kavita Gandh hya chitrapatat aikli Hoti.Sampurn Kavita vachayla changal vatal.Upload karnaryala khup Sare dhanyawad.Kuni hya kavitecha arth sangu shakel Ka ??Mala samjayla avaghad vatatiye aani samjun ghenyachi ichha pan aahe.

    ReplyDelete
  8. कविता संग्रहाचे नाव काय ज्यामध्ये हि कविता आहे?

    ReplyDelete
  9. Khup sundar kavita. Thank you for putting it up!

    ReplyDelete